12 डिसेंबर म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस. थलैवाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी चाहते पुढाकार घेत असतात, मात्र गेल्या तीन दशकांपासून रजनीने आपल्या वाढदिवशी घरी किंबहुना शहरात किंवा देशातच राहणं टाळलं आहे, आणि त्याचं कारण हृदयाला चटका लावणारं आहे.पाच वर्षांपूर्वी म्हणजे 12-12-12 रोजी रजनीकांतने चेन्नईत आपल्या हार्डकोअर चाहत्यां ना याचं कारण सांगितलं होत.मी नेहमीच माझ्या बर्थडेला शहरात असायचो. सुमारे 22 वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाला माझे तीन चाहते मला भेटून घरी परतत होते. त्यावेळी कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दुःखात बुडालेल्या त्या तिघांच्या पालकांनी मला एक प्रश्न विचारला. त्याचं उत्तर मला देता आलं नाही. मला तो प्रश्न कोणालाच सांगायचा नाही. पण त्या दिवसानंतर वाढदिवासाला आपल्या घरी न थांबण्याचं मी ठरवलं' असं रहस्य त्याने उलगडलं होतं.माझ्या या निर्णयानंतर मी परगावी जायला लागलो. आतापर्यंत आयुष्यात काय काय केलं, याबाबत आत्मपरीक्षण करतो. सध्या मी काय करतोय आणि भविष्यात काय करायला आवडेल, याचा विचार करतो.' असं रजनीकांतने सांगितलं होतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews